कोकण संस्थेच्या पुढाकाराने पुण्यातील ५ शाळांना स्वच्छ पाण्याची सुविधा

कोकण संस्थेच्या पुढाकाराने पुण्यातील ५ शाळांना स्वच्छ पाण्याची सुविधा

 


पुणे 

 

     विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्था (कोकण एनजीओ) यांच्या पुढाकारातून आणि कोमात्सू कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत पुणे परिसरातील पाच शाळांमध्ये वॉटर फिल्टर यंत्रणा बसविण्यात आली आहे. या प्रकल्पाचा थेट लाभ सुमारे १,५६७ विद्यार्थ्यांना होणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन जि. प. शाळा, मांजरी बुद्रुक येथे पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला आंबिलकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी वॉटर फिल्टर यंत्रणेचे रिबन कापून उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी कोमात्सू कंपनीचे प्रतिनिधी सुधीर नारायणन, अजित हिंगे, महिमा रंजन पाल, देबस्री प्रधान, दीपक पाडोळे, शिवकुमार भट आणि परशुराम केवटे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या आयोजनात कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या पुढाकाराने अजिंक्य शिंदे, संतोष ढोके, सलिना बुटेलो, निकिता कांटाळे आणि विष्णू ठाकरे यांनी समन्वयाची भूमिका बजावली.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे हस्तनिर्मित शुभेच्छापत्रे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच कोमात्सूच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू व अल्पोपहार देत त्यांच्याशी संवाद साधला.या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.