मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील एक खलाशी समुद्रात पडून बेपत्ता

मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील एक खलाशी समुद्रात पडून बेपत्ता

 

मालवण

 

    समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील एक खलाशी समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. रुपेश गोपाळ जुवाटकर (वय अंदाजे, रा. गाबीत केळी, ता. अंकोला, कारवार) असे बेपत्ता झालेल्या खलाशाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ऑलविन फर्नांडिस यांच्या मालकीची 'मदर मेरी' ही बल्याव नौका चार खलाशांसह रविवारी मासेमारीसाठी मालवण समुद्रात गेली होती. मासेमारी आटोपून मंगळवारी सकाळी ही नौका मालवण बंदराच्या दिशेने परतत होती. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रुपेश जुवाटकर हा नौकेत उभा राहून दात घासत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खोल समुद्रात पडला. रुपेश पाण्यात पडल्याचे लक्षात येताच नौकेतील इतर खलाशांनी तातडीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो मिळाला नाही. या घटनेबाबत नौका मालक ऑलविन फर्नांडिस यांनी मालवण पोलीस ठाण्यात रीतसर खबर दिली आहे. या घटनेची नोंद करण्यात आली असून मालवण पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.