कुडाळ येथे ८ मार्च रोजी रंगणार 'कुडाळ साडी वॉकेथॉन'.....सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन

कुडाळ येथे ८ मार्च रोजी रंगणार 'कुडाळ साडी वॉकेथॉन'.....सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन

कुडाळ

 

      जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या पुढाकाराने येत्या ८ मार्च ला सकाळी ७ वाजता 'कुडाळ साडी वॉकेथॉन-२०२६' रंगणार आहे.पारंपरिक वेशभूषा आणि आधुनिक आरोग्याचा संदेश देणारा हा उपक्रम केवळ महिलांसाठी असून, यात साडी परिधान करून महिलांना सहभागी होता येणार आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान आणि जागर करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत २०० हून अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदवला असून शहरात या उपक्रमाची मोठी चर्चा सुरू आहे.ही वॉकेथॉन दीड किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा दोन गटांत विभागली असून रविवार सकाळी ६:३० वाजता महालक्ष्मी सभागृह येथे रिपोर्टिंग वेळ देण्यात आली आहे.दीड किलोमीटरचा मार्ग महालक्ष्मी सभागृहापासून सुरू होऊन भैरव मंदिर, बस स्थानक, बाजारपेठ आणि पानबाजार मार्गे पुन्हा सभागृहाकडे येईल. तर तीन किलोमीटरचा मार्ग नक्षत्र टॉवर, जिजामाता चौक आणि छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत जाऊन परत फिरणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आयोजकांतर्फे पदक, आकर्षक भेटवस्तू, सरप्राईज कूपन आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्या महिला अत्यंत लक्षवेधी साडी परिधान करून सहभागी होतील, त्यातील पहिल्या तीन क्रमांकांना साडी देऊन गौरवण्यात येईल. कोणत्याही वयोगटातील महिला १०० रुपये प्रवेश शुल्क भरून यात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ८२०८७१२६९२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.