दिवाळीचे किल्ले बनविण्यासाठी बच्चे कंपनीची लगबग

दिवाळीचे किल्ले बनविण्यासाठी बच्चे कंपनीची लगबग


परुळे प्रतिनिधी 

      दिवाळी या सणाला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. याला दिव्यांचा सण असेही म्हटले जाते. त्याचबरोबर दिवाळीत गडकिल्ले बनविण्याची परंपरा आजदेखील कायम आहे. बच्चे मोठे शालेय विद्यार्थी देखील दिवाळीचे मातीचे किल्ले बनवतात. हे गडकिल्ले पाहताना साक्षात शिवसृष्टीच अवतरल्याचे वाटते.  यंदाही दिवाळीत गड-किल्ले साकारण्याची लगबग सुरू झाली आहे. परुळे परिसरासह विविध ठिकाणी गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या जात आहेत. परीक्षा  संपल्यानंतर दिवाळीतील सुट्टीचा आनंद मुलानी घ्यायला सुरुवात केली आहे मुलांनी अशाच देखण्या प्रतिकृती साकारल्या आहेत. या मध्ये प्रतापगड  सिंधुदुर्ग विजयदुर्ग रत्नदुर्ग त्यांच्या सारख्या किल्ले प्रतिकृती मुले गड किल्ल्यांचा पराक्रमी इतिहास आपल्या चौकस बुद्धिमत्तेतून स्वयंप्रेरणेने साकारत आहेत व ईतिहास ची ओळख करून घेत आहेत. याच बरोबर कोकणातील दिवाळीतील मुख्य आकर्षण म्हणजे नरकासुर बनवणे यांसाठी मुलांबरोबरच तरुण मंडळी सुध्दा कामाला लागले आहेत. विविधांगी आकाराचे नरकासुर तयार केले जात आहेत अभ्यंगस्नान च्या आधी पहाटे त्यांचे दहन करून दिवाळीला सुरुवात होईल.