मिठमुंबरी- बागवाडी बीचवर ११८ ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना जीवदान.

मिठमुंबरी- बागवाडी बीचवर ११८ ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना जीवदान.

देवगड.

   मिठमुंबरी बीचवर ऑलिव्ह रिडले कासवांची एका घरट्यातून १२३ अंड्यापैकी ८१ पिल्ले तर दुसऱ्या घरट्यातून ९५ पैकी ३७ पिल्ले सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात आली .सदर ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी ही २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता घरट्यात जमा केली होती. सदर पिल्ले तब्बल ५३ दिवसांनी अंड्यातून बाहेर पडली. यावेळी लहान मुलांनी देखील या दृश्याचा मनमुराद आनंद लुटला.याप्रसंगी वनविभागाचे देवगड विभागाचे वनरक्षक निलेश साठे, वनमजूर कृष्णा सुद्रिक मिठमुंबरी गावचे सरपंच बाळकृष्ण गांवकर, कांदळवन समितीचे बीच मॅनेजर लक्ष्मण तारी, उपस्थित होते.
  सदर कासव संवर्धन मोहीम राबवण्यासाठी बागवाडीचे ग्रामस्थ नारायण तारी व मयुरेश तारी,ओमकार तारी यांनी विशेष मेहनत घेतली.यावेळी ग्रामस्थ प्रमोद आडकर, रोहन तारी, अभय पराडकर, नंदकिशोर पराडकर, हितेश खवळे, भुषण टिकम आणि मिठमुंबरी बीचवरील बहुसंख्य पर्यटक यावेळी उपस्थित होते.