मालवणात विद्यार्थ्यांसह प्रौढांसाठी कला शिबिराचे आयोजन.
मालवण
चित्रकलेच्या क्षेत्रात आवड असणाऱ्या छोट्या-मोठ्या कलाप्रेमी विद्यार्थी व प्रौढांसाठी दिवाळी सुटीत कला संस्था गोडकर्स आर्ट अॅकॅडमी तर्फे ४ ते १० नोव्हेंबर या कालावधीत कला शिबिर आयोजित केले आहे.
शिशु वर्गापासून दहावीपर्यंत व महाविद्यालयीन गटापासून कलाप्रेमी प्रौढांपर्यंत सर्वजण कला शिबिरात सहभागी होऊ शकतात. ड्रॉईंग, पेंटिंग, सेंडिंग, चारकोल, ग्रीटिंग कार्ड, कोलाज पेंटिंग टेक्निक, अॅक्रेलिक, स्टिकर्स, आर्ट क्राफ्ट, इंक ड्रॉईंग, मॅजिक पेंटिंग असे अनेक रंजक कला विषयांचे मार्गदर्शन वयोगटानुसार करून दिले जाणार आहे. गेली ३०-३५ वर्षे कलेच्या क्षेत्रात मार्गदर्शन करणाऱ्या या संस्थेच्या संस्थापक प्रसिद्ध चित्रकार विनायक गोडकर हे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
४ ते १० नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ८ ते १०, १० ते १२, सायंकाळी ४ ते ६, ६ ते ८ अशा दोन तासांच्या कालावधीमध्ये हा उपक्रम होणार आहे. प्रत्येक गटात २० जणांना प्रवेश दिला जाणार आहे. सुटीच्या काळात आपल्यातील कलागुणांना योग्य मार्ग- दर्शनाचा या संधीचा लाभ कलाप्रेमींनी घ्यावा. अधिक माहितीसाठी गोडकर्स आर्ट अकॅडमी रेवतळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.