वेंगुर्लेत नववर्ष स्वागत यात्रेचे शानदार आयोजन

वेंगुर्लेत नववर्ष स्वागत यात्रेचे शानदार आयोजन

वेंगुर्ला
 

  वेंगुर्ला येथे नववर्ष स्वागत यात्रा २०२६ भव्यदिव्य पद्धतीने करण्यात येणार आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती वेंगुर्ले संयोजक पदी गिरीश फाटक यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदू धर्माभिमानी बाबुराव खवणेकर यांनी दिली. नववर्ष स्वागत यात्रा २०२६ ची पहिली नियोजन बैठक आज शनिवारी सायंकाळी येथील विठ्ठल मंदिर येथे पार पडली.
   यावेळी प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नित्यानंद आठलेकर, आशिष पाडगावकर, राजन केरकर, वसंत तांडेल, विद्याधर कडुलकर, तुळशीदास ठाकूर, अजय गडेकर, साईप्रसाद नाईक, रिया केरकर, ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, गौरी मराठे, सुजाता पडवळ, वृंदा मोर्डेकर, वैभव होडावडेकर, अभि वेंगुर्लेकर, युवराज ठाकूर, दिनेश आचार्य, गुरुप्रसाद प्रभुखानोलकर, अमित नाईक, अमोल आरोसकर आदी हिंदू धर्माभीमानी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी संपूर्ण तालुक्यातील विविध समाजाचे, संस्थाचे, सामाजिक कार्यातील मान्यवर, शहरातील, तालुक्यातील विविध पदाधिकारी यांची एकत्रित नववर्षाची यात्रा गतवर्षीपेक्षा भव्यदिव्य करण्यासाठी शहर व संपूर्ण तालुक्यातील हिंदू धर्माभिमानी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी विशेष बैठका घेण्यात येऊन पुढील नियोजन करण्यात येणार आहे, असे यावेळी प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.