राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी.

मुंबई.
राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. त्यामुळे येथील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच नदीपत्रापासून दूर राहा असे देखील आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड तर अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर, इतर ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, पुणे, सातारा, जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कही जिल्हे वगळता राज्यात इतर ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.