उद्या इन्सुली क्षेत्रफळ येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

उद्या इन्सुली क्षेत्रफळ येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

सावंतवाडी.

   हनुमान प्रासादिक भजन मंडळ आणि क्षेत्रफळवाडी ग्रामस्थ तरुण युवक व महिला मंडळ इन्सुली क्षेत्रफळवाडी यांच्या वतीने मंगळवार  दि.२३ एप्रिल २०२४ रोजी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
  यावेळी सकाळी ठीक ७.०० वाजता श्री हनुमान जन्मोत्सव जयंती साजरी करण्यात येणार आहे.त्या निमित्ताने सत्नारायण महापूजा व महाप्रसाद तसेच खास महिलासाठी हळदीकुंकु तर संध्याकाळी भजन व तर रात्री ९.०० वाजता श्री शेखर शेणई प्रस्तुत ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला - परबवाडा यांचे भक्तिमहिमा अर्थात रामदर्शन या दणदणीत नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
   तरी इन्सुली गावातील सर्व ग्रामस्थ, हनुमान भक्त यांना मंडळाच्या वतीने आग्रहाची विनंती आहे की या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यात यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात येत आहे.