सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत भोगवे शेळपी शाळेचे उल्लेखनीय यश.
वेंगुर्ला.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये भोगवे शेळपी शाळेची 9 मुले सहभागी झाली होती.ही परीक्षा 200 गुणांची होती.त्याचा आज निकाल लागला त्यामध्ये शाळेचा 100% निकाल लागला आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण पुढीलप्रमाणे -
इयत्ता दुसरी - श्रेया सखाराम राणे (96). इयत्ता तीसरी - आदित्य गंगाराम परब (132 सिल्व्हर मेडल), लौकिक केशव मुंडये (94) वेदांत विठ्ठल मुंडये (86). इयत्ता चौथी- नंदिनी संतोष मांजरेकर (82). इयत्ता सहावी शुभम सुधाकर आमडोसकर (88) ममता महादेव गायकवाड (102), सिध्दी श्रीकृष्ण परब (100). इयत्ता सातवी नंदिता मंगेश गायकवाड (94).
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन तसेच आदित्य गंगाराम परब याला सिल्व्हर मेडल प्राप्त झाल्यामुळे त्याच विविध स्तरातून विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.