भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले श्री देव मानसीश्वराचे दर्शन

भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले श्री देव मानसीश्वराचे दर्शन

 

वेंगुर्ला

 

        सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक तेजस्वी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे भाजप युवा नेते विशाल परब यांनी नुकतेच जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मानसीश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी विनोद राऊळ यांचीही प्रमुख उपस्थिती होती. विशाल परब यांनी देवळात जाऊन विधिवत पूजा-अर्चा केली. केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघातील जनतेला सुख, समाधान आणि समृद्धी लाभू दे, असे साकडे त्यांनी यावेळी देवाच्या चरणी घातले. या दर्शनावेळी विशाल परब यांच्यासोबत भाजपचे निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज उपस्थित होती. विशाल परब यांच्या या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी देवाचा आशीर्वाद घेऊन परब यांनी एका नव्या ऊर्जेसह जनसंपर्काला सुरुवात केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.