श्री हरिचरणगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव १९ जुलै रोजी; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

श्री हरिचरणगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव १९ जुलै रोजी; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

वेंगुर्ला.
  
   हरिचरणगिरी येथील मठात श्री हरिचरणगिरी महाराजांची पुण्यतिथी व वार्षिकोत्सव शुक्रवार १९ जुलै रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये साजरी होणार आहे.
    कोकणातील प्राचीन मठापैकी एक असलेल्या हरिचरणगिरी मठात श्री हरिचरणगिरी महाराजांची संजीवन समाधी आहे.श्री हरिचरणगिरी महाराज वार्षिक पुण्यतिथी उत्सवास १९ जुलै रोजी सकाळी मठातील सर्व समाधी पूजनाने सुरुवात होईल त्यानंतर लघुरुद्राभिषेक,दुपारी  नैवेद्य ,महाआरती ,दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ ग्रामस्थांचे भजन, सायंकाळी ५ ते  ७:३० ह.भ.प.भाऊ नाईक (वेतोरे)यांचे कीर्तन.सायंकाळी ७ वाजता धुपारती व पुराण वाचन ,रात्री ९ वाजता ह.भ.प. कैलास खरे (डोंबिवली)  यांचे किर्तन,रात्रौ १२ ते ३ स्थानिकांची भजने, रात्रौ ३ वाजता ह.भ. प मकरंद देसाई (केळूस) यांचे किर्तन, पहाटे ५ वाजता श्री रत्नाकर प्रभू आणि सहकारी (कोचरा) यांच्या लळीताच्या कार्यक्रमाने या  वार्षिक उत्सवाची सांगता होणार आहे.या वार्षिक पुण्यतिथी उत्सवास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींच्या समाधीचे दर्शन घेतात.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमठ हरिचरणगिरी ट्रस्ट च्यावतीने करण्यात आले आहे.