अणसूर दाडोबाचा मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

अणसूर दाडोबाचा मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

 


वेंगुर्ला

 

       वेंगुर्ला तालुक्यातील खालचे अणसूर येथील श्री देव दाडोबा मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीपुर्ण वातावरणात साजरा झाला.यानिमित्ताने १२ रोजी स. १० वा. श्री देव दाडोबा प्रवेशद्वाराचे उद्घाटन संपन्न झाले. सायं. ४ वा. प्रायश्चित विधी, ५ वा. स्थानिक महिलांच्या लेझीम पथकासह शिखर कलशाचे सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले. दुस-या दिवशी रविवारी स. ७. ३० ते १. ३० वा. गणपती पूजन, मंगलाचरण, देवताना आमंत्रण, सामुदायिक प्रार्थना, संप्रोक्षण विधी, होम, मंत्रपुष्पांजली, आरती, दुपारी २ वा. महाप्रसाद, सायं. ६ वा. स्थानिक भजने, सायं. ७.३० वा, मंदिरात आरती, १३ पूर्णाहिती, श्रेयोदान, सामुदायिक १० वा. दशावतार नाटक सादर करण्यात आले. सोमवारी सकाळी १०,५५ वा. शिखर कलश शिखर प्रतिष्ठापना भक्ती पुर्ण वातावरण व हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर कलश स्नपन होम, हरिहर यागांगभूत सुक्त, मंत्रपुष्पांजली, दुपारी २ वा. महाप्रसाद, सायं. ६ वा. स्थानिक भजने सादर करण्यात आली.