सावंतवाडी कुणकेरी श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव २ मे रोजी

सावंतवाडी कुणकेरी श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव २ मे रोजी

 

सावंतवाडी

 

    सावंतवाडी कुणकेरी येथील सावंत भोसले समाजाचे कुलदैवत श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवारी २ मे रोजी होत असून यानिमित्त कुणकेरी भवानीवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता मानसन्मान, सकाळी १० वाजल्यापासुन ओट्या भरणे, सायंकाळी ३ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता मांड भरणे, रात्री ११ वाजता गोंधळी पुराणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ६:३० वाजता या त्रैवार्षिक गोंधळ उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंत भोसले समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.