बांदा येथे बोधीसत्व अनागारिक धम्मपाल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

सावंतवाडी.
त्रिरत्न बौद्ध महासंघ सिंधुदुर्ग केंद्राच्या वतीने दि.१७ सप्टेंबर रोजी बांदा येथील धम्ममित्र शांताराम असनकर यांच्या निवासस्थानी बौद्ध धम्माचे महान धम्म सेनानी, अभ्यासक ज्यांनी आपली पूर्ण हयात बौद्ध धम्माच्या प्रसारात व प्रचारासाठी खर्च घातली ज्यांनी आपल्यावर औषध उपचार न करता त्या पैशातून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करा असे सांगणारे अनागारिक धम्मपाल यांची १६० वी जयंती साजरी करण्यात आली.
सुरुवातीला कार्यक्रमात उपस्थित आद.धम्मचारी तेजबोधी, धम्मचारिणी यशोमती, धम्मचारी अमृतसागर व धम्ममित्र मिलिंद सर्पे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पांजली अर्पण करुन बुद्ध पुजा वंदना घेण्यात आली.पुजावंदनेनंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी त्रिरत्न बौद्ध महासंघ सिंधुदुर्ग सेंटरचे चेअरमन आद.धम्मचारी अमृतसागर यांचे धम्मप्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रवचनाची सुरुवात बोधीसत्व अनागारिक धम्मपाल यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करुन करण्यात आली. यानंतर आद.धम्मचारी अमृतसागर यांनी धम्मप्रवचन देताना त्यांनी अनागारिक धम्मपाल यांच्या जीवनकार्याचा गौरव केला तसेच बौद्धगया मुक्तीच्या लढ्यासाठी त्यांचे योगदान खुप मोलाचे होते.यावेळी त्यांनी झालेल्या त्रासावर लक्ष न देता बौद्ध धम्म लयास गेलेल्या काळात बौद्ध धम्माला उर्जितावस्था प्राप्त करून दिली आणि जगाच लक्ष बुध्दगयेकडे वळविले या मुक्तीच्या आंदोलनात सर्व विश्वाला सामावून घेतले हे त्यांचे कार्य बौद्ध जगतासाठी अजरामर आहे असे त्यांनी आपल्या प्रवचनातून विशद केले.
यावेळी आदरणीय धम्मचारी तेजबोधी आद.धम्मचारी जिनजित्त आणि आद.धम्मचारिणी यशोमती तसेच धम्ममित्र मिलिंद सर्पे, ध.अभय पावसकर, ध.अजय तांबे ध.अमोल पावसकर, ध.उत्तम डिंगणेकर व परिवार, धम्ममित्र शांताराम असनकर परिवार, आयु.संदीप वायंगणकर व परिवार, शलाका शेर्लेकर, पूर्वी जाधव, यशोधन पावसकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक धम्ममित्र परेश जाधव,तर आभार धम्ममित्र शांताराम असनकर यांनी केले. शेवटी मैत्री गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.