अर्थसंकल्पात मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद

अर्थसंकल्पात मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची  सर्वात जास्त तरतूद

मुंबई


      निर्णय क्षमता आणि कामाचा उरक असलेल्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारने मोठी तरतूद करून दिली आहे. बंदरे विकासासाठी 484 कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी 240 कोटींची तरतूद केली गेली आहे. दोन्ही खात्यांचे मिळून 724 कोटी रुपये ची तरतूद अर्थसंकल्पात केली गेली असून अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला यावेळी या रकमेची मांडणी विधानसभेत केली गेली आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कामाला प्रोत्साहन दिले गेले. या दोन्ही खात्यांची अर्थसंकल्पातील आत्तापर्यंतची ही सर्वात जास्त तरतूद असून बंदरे आणि मत्स्य व्यवसाय खात्याला प्रथमच एवढी जास्त प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. मंत्री राणे यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून गेल्या शंभर दिवसाच्या कालावधीत फार मोठ्या प्रमाणात काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या कामाची दखल घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव तरतूद करण्यासंदर्भात निर्णय घेतला आणि तशा पद्धतीने अर्थसंकल्पात तो दिसूनही आला. यात अनेक कामाचा समावेश होणार आहे. बंदर विकासाबरोबरच मच्छीमारांचे प्रश्न सुद्धा या माध्यमातून सुटणार आहेत.