महाराष्ट्रातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका जाहीर!
मुंबई
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन अर्ज सुरू: 10 नोव्हेंबर 2025
अंतिम मुदत: 17 नोव्हेंबर 2025
छाननी: 18 नोव्हेंबर 2025
माघार घेण्याची अंतिम तारीख: 21 नोव्हेंबर (अपील 25 नोव्हेंबर)
उमेदवारांची अंतिम यादी: 26 नोव्हेंबर 2025
मतदान: 2 डिसेंबर 2025
मतमोजणी: 3 डिसेंबर 2025
एकूण निवडणुका:
नगरपरिषदा – 246 (यापैकी 10 नवीन)
नगरपंचायती – 42 (यापैकी 15 नवीन)
निवड होणारे सदस्य – 86,859
निवड होणारे अध्यक्ष – 288
खर्च मर्यादा
अ वर्ग नगरपरिषद: अध्यक्ष ₹15 लाख | सदस्य ₹5 लाख
ब वर्ग नगरपरिषद: अध्यक्ष ₹11.25 लाख | सदस्य ₹3.5 लाख
क वर्ग नगरपरिषद: अध्यक्ष ₹7.5 लाख | सदस्य ₹2.5 लाख
नगरपंचायत: अध्यक्ष ₹6 लाख | सदस्य ₹2.25 लाख
नामनिर्देशन ऑनलाइन दाखल करता येईल. जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य असून, अर्ज केलेल्यांना पावती दाखल करता येईल. राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

konkansamwad 
