राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा.
मुंबई.
राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना देखील आज यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवस तर कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात उद्या सात तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांच्या घाट विभागासाठी यलो अलर्ट दिलेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे ७ व ८ ऑगस्टला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना व पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना आठ तारखेला यल्लो अलर्ट दिलेला आहे. आज औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे.