एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रिकल विभागातील १२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये नोकरीसाठी निवड.

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रिकल विभागातील १२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये नोकरीसाठी निवड.

कणकवली.

   एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रिकल शाखेतील 12 विद्यार्थ्यांची मरीन इलेक्ट्रिकल (  Marine Electrical), व्ही.टी.पी. रिऍलिटी, पुणे (VTP Reality, Pune), महापारेषण.(Mahatransco Kankavali) या कंपन्यामध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
    इलेक्ट्रिकल शाखेमधुन, अभय जाधव, अश्लेष कदम,  रूपेश हुम्बे, तन्वी मस्के, ओंकार जामसंडेकर, ओमकार शेट्टी, रामचंद्र मेस्त्री, श्रेयस चव्हाण, कौस्तुभ सावंत, सुरज बेंदाल यांची मरीन इलेक्ट्रिकल, किरण जगताप हिची व्ही.टी.पी. रिऍलिटी,  पुणे, तर दत्ताराम राणे ह्याची महापारेषण कणकवली येथे निवड झाली आहे. विशेष म्हणजे यश संपादन करण्याऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षण जून 2024 मध्ये पूर्ण होणार आहे.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता व शिकत असलेल्या विषयांचे आकलन या सर्व पात्रता फेरींमधुन गेल्यानंतर अंतिम मुलाखतीसाठी निवड होते.
   एस एस पी एम च्या विद्यार्थ्यांची तंत्रशिक्षणाची आवड आणि त्यांना मिळणारे मार्गदर्शन यामुळेच त्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड होऊ शकते हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
   एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या मागील 24 वर्षांपासून संस्थापक नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा निलम राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ऊपलब्ध करून देत आहे.विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण व रोजगार ऊपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांच्या प्रयत्नांना संस्थेचे ही तितकेच पाठबळ मिळत आहे.
   सदरच्या निवड प्रक्रियेकरीता इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट  ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट को- ऑर्दिनेटर प्रा. नितिन सावंत आणि टी. पी.ओ.प्रा.सोमनाथ मेलसगरे यांनी विशेष प्रयत्न केले. इलेक्ट्रिकल विभागातील  2023-24 या वर्षात  जवळपास 75% विद्यार्थी ना placement ऑफर मिळालेल्या आहेत.
   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा  निलमताई राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव  नितेश राणे, प्राचार्य डॉ.एम.के.साटम, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.