श्री कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

श्री कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

देवगड.

    श्री कुणकेश्वर मंदिर येथे देवस्थान ट्रस्ट वतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व प्रकारच्या आजारांच्या तपासण्या व मोफत औषध वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे नेत्र चिकित्सा करुन मोफत चष्मा वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रीया ट्रस्ट वतीने मोफत करण्यात येणार आहे. या शिबीरादरम्यान एकंदर ५६९ एवढ्या रुग्णांनी लाभ घेतला.या शिबीराचे उद्घाटन मान. श्री राजाराम सावंत मुंबई (महाराष्ट्र मेडिकल कौन्सील ) यांचे हस्ते संपन्न झाले. दरम्यान देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री संतोष हरी लब्दे उपाध्यक्ष श्री. दिनेश महादेव धुवाळी सचिव श्री शरद शिवराम वाळके खजिनदार श्री. अभय बाबाजी पेडणेकर आणि विश्वस्त मंडळाचे सदस्य, डॉ. अमेय देसाई मुंबई डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. आर. एस. कुलकर्णी, डॉ. उमेश पाटील वैद्यकीय तालुका अधिकारी देवगड, श्री. प्रणय तेली, श्री. राजन बोभाटे, श्री. प्रविण पोकळे, श्री. रवि परब, ग्रा.प. कुणकेश्वर प्रभारी सरपंच श्री. शशिकांत लब्दे, ग्रा. प. माजी सरपंच श्री. चंद्रकांत घाडी, ट्रस्ट व्यवस्थापक श्री.रामदास तेजम तसेच इतर मान्यवर व तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या शिबीराच्या आयोजना दरम्यान देवस्थान ट्रस्टला रोटरी क्लब ऑफ मॅगो सिटी देवगड, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज जामसंडे-देवगड यांचे विषेश सहकार्य लाभले.याशिबीराच्या निमित्ताने रोटरी क्लब देवगड व कणकवली वतीने देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर मंदिरास देणगी दाखल यांच्या व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.
  या शिबीरामध्ये मेडीसिन विभाग डॉ. अमेय देसाई, डॉ. जि.टी. राणे, डॉ. विवेक रेवडीकर. सर्जरी विभाग - डॉ विद्यधर तायशेटे, डॉ. संदिप सावंत, डॉ. महेद्र आचरेकर स्त्री रोग विभाग - डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. अश्विनी नवरे, डॉ. सौ. आचरेकर, अस्थिरोग विभाग डॉ. योगेश नवांगुळ, डॉ. समीर नवरे, डॉ. धनंजय रासम, डॉ. तन्मय आठवले, डॉ. सर्वेश तायशेटे, डॉ.आर. एस.कुलकर्णी कान नाक घसा विभाग डॉ. ओंकार वेदक, डॉ. प्रिता नायगांकर हृदयरोग विभाग डॉ. राजगोपाल मेनन, बालरोग विभाग डॉ. प्रशांत मोघे, त्वचारोग विभाग डॉ. चेतन म्हाडगुत दंत रोग विभाग डॉ. अभिजित आपटे, डॉ.अमेय मराठे, डॉ. सोनाली भिडे, डॉ. स्वप्निल राणे, नेत्र रोग तसेच जनरल फिजिशियन डॉ. रामदास बोरकर, डॉ. सुनिल आठवले, डॉ.विभाग डॉ. बाळासाहेब जोशी, डॉ. प्रसाद गुरव, डॉ. निखिलेश शेटे व नेत्र रोग अधिकारी उमेश पाटील, डॉ. रविंद्र राठोड व इतर तालुका अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.