वेंगुर्ला येथे आढळला साडे दहा फुटी अजगर. अजगराला सुरक्षित रेस्क्यू करण्यात सर्पमित्र महेश राऊळ यांना यश.

वेंगुर्ला येथे आढळला साडे दहा फुटी अजगर.   अजगराला सुरक्षित रेस्क्यू करण्यात सर्पमित्र महेश राऊळ यांना यश.

वेंगुर्ला.

   येथील मातोंड सावंतवाडा येथे विकी गावडे यांच्या घरी रात्री एक भला मोठा अजगर जातीचा साप पहावयास मिळाला. या अजगराची लांबी साडेदहा फुट एवढी होती. सर्पमित्र महेश राऊळ यांनी सुरक्षित रित्या रेस्क्यू करून त्या अजगरा ला नैसर्गिक अधिवासात सोडले.
   याबद्दल अधिक माहिती अशी की रात्री साडेनऊ वाजता महेश राऊळ यांना फोन आला की घराच्या छपरावर अजगर अडकला आहे. लगेच सर्पमित्र राऊळ विकी गावडे यांच्या घरी पोहोचले. घरातून पाहिलं असता माडीच्या छपराच्या कोन्यामध्ये अजगर वेटोळे घालून होता. महेश राऊळ बाहेरून शिडीच्या सहायाने घराच्या शेवाळलेल्या छपरावर चढले पाय टिकत नव्हते तरी अथक प्रयत्नाने घराच्या डबल छपरावर चढले. त्यानंतर जिथे अजगर होता त्या ठिकाणचे पूर्ण नळे बाजूला केल्यावर त्यांनी अजगराला पकडले पण अजगर छपराच्या वाशा ला घट्ट वेटोळे घालून होता त्यामुळे आपल्या  जागेवरून तो हलतही नव्हता.अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने अजगराला सुरक्षित रेस्क्यू करण्यात सर्पमित्र राऊळ यांना यश आले. वनरक्षक विष्णू नरळे तसेच अभय सावंत, केतन पंडित,रामू सावंत यांनीही त्यांना विशेष सहकार्य केले. छपरावरून खाली आल्यावर  त्यांनी त्या अजगराला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
   सर्पमित्र महेश राऊळ यांनी आतापर्यंत अनेक प्रकारचे विषारी बिनविषारी साप मानवी वस्तीतून सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडलेले आहे.