कणकवली तालुक्याला पावसाने झोडपले

कणकवली तालुक्याला पावसाने झोडपले

 

कणकवली

 

       कणकवली तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरालगतच्या जानवली आणि गड नदीपात्रात पूर स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर पाणी आल्याने आज आचरा, कळसुली, शिवडाव, असगणी, बोर्डवे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. दिवसभर सरी कोसळत असल्याने महामार्ग आणि बाजारपेठेतील वर्दळही मंदावली होती. कणकवली तालुक्यात दिवसभरात मुसळधार पाऊस झाल्याने गड आणि जानवली नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. तालुक्यातील खारेपाटण परिसरातही दोन दिवस पाऊस कोसळत आहे. कणकवली बाजारपेठेत आज सकाळच्या सत्रात वर्दळ होती. दुपारनंतर पावसाचा जोर कायम असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता.