उन्हाळी सुट्टी निमित्त कोकण रेल्वेगाड्यांचे विशेष वेळापत्रक सज्ज

मुंबई
कोकणाकडे जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड असते. याचीच दखल घेत कोकण रेल्वे प्रशासनाकडून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता हा आकडा विभाजित करून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मदतीने कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. यासाठीची सविस्तर माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. माहितीनुसार मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर गाडी क्रमांक 01151 / 01152 सीएसएमटी- करमळी- सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी धावणार आहे. गाडी क्रमांक 01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी ते करमळी विशेष (साप्ताहिक) 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी सीएसएमटीहून (CSMT) रात्री 12 :20 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी 1:30 पर्यंत करमळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01152 करमळी ते सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) वरील रेल्वेच्या निर्धारित दिवसांमध्ये धावणार आहे. दर गुरुवारी दुपारी 1: 15 वाजता ती करमळीवरून निघेल आणि ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री 3: 45 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. वरील दोन्ही गाड्या 22 डब्यांच्या अशी माहिती देण्यात आली आहे.गाडी क्रमांक 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) ही विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी दरम्यान 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनसमधून रात्री 10:15 ला सुटेल. हे वेळापत्रक बघता रेल्वेच्या अधिकृत तिकीट आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.