साहित्यिक वैशाली पंडित यांच्या 'मंत्रभूल' पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर

साहित्यिक वैशाली पंडित यांच्या 'मंत्रभूल' पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर

 

मालवण

 

     कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाड्मयीन  पुरस्कार जाहीर झाले असून यात सिंधुदुर्ग मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांच्या 'मंत्रभूल' या पुस्तकाला 'कै.अनंत काणेकर ललितगद्य प्रथम पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय अध्यक्ष सौ. नमिता किर यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे संपन्न झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.मंत्रभूल हे सकाळ प्रकाशनाकडून प्रकाशित झालेले पुस्तक आहे. यात वैशाली पंडित यांच्या खास शैलीतील विविध विषयांवर लिहिलेले ललित लेख समाविष्ट आहेत. या पुस्तकाला चतुरस्त्र अभिनेते आणि लेखक श्री. समीर चौघुले यांची प्रस्तावना आहे तर सुप्रसिद्ध कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांची पाठराखण लाभली आहे. न्हावेली येथील शब्दसखा समूहाच्यावतीने मंत्रभूल पुस्तकाचा वाचकार्पण सोहळा संपन्न झाला होता. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून साहित्यिक योगदान देत असलेल्या वैशाली पंडित यांचे, शब्दसखा समूहातील सदस्य तसेच मराठी साहित्य वर्तुळातून आणि विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.