वैश्य समाज सहकारी पतसंस्था जिल्हा संचालकपदी उमेश वाळके विजयी.

वैश्य समाज सहकारी पतसंस्था जिल्हा संचालकपदी उमेश वाळके विजयी.

सिंधुदुर्ग.

  सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली शहराध्यक्ष तथा उमेदवार उमेश वाळके हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. वैश्य समाज पतसंस्था संचालकपदाची निवडणूक आज सकाळी ओरोस येथे मतमोजणी करण्यात आली. त्यात उमेश वाळके यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार ऍड. दीपक अंधारी यांचा पराभव करत संचालकपदाची निवडणूक जिंकली आहे. उमेश वाळके यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे.