उद्या रंगणार भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामना. ऑस्ट्रेलिया चे उपपंतप्रधान तसेच विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे. वन डे विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा बहुचर्चित सामना होत आहे. यासाठी खास क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्यात आली असून चाहत्यांना मनोरंजन करण्यासाठी बीसीसीआयने काही कार्यक्रमांचे आयोजन केले. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स हे देखील उद्याचा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थिती असणार आहेत.