संगमेश्वर रेल्वे स्थानकात सुविधा आणि गाड्यांच्या थांब्यासाठी संघर्ष करणा-या पत्रकार संदेश जिमन यांचा मुंबईत होणार विशेष सन्मान.

संगमेश्वर रेल्वे स्थानकात सुविधा आणि गाड्यांच्या थांब्यासाठी संघर्ष करणा-या पत्रकार संदेश जिमन यांचा मुंबईत होणार विशेष सन्मान.

रत्नागिरी.

 कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावरील समस्या सोडवुन प्रवाशांना सुविधा मिळवुन देण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करणा-या मुळच्या संगमेश्वरच्या आणि ठाण्यात वास्तव्यास असणा-या पत्रकार संदेश जिमन यांच्या कार्याची 'शिवभक्त कोंकण आणि निलक्रियेटर' या संस्थांनी दखल घेतली असून या संस्था येत्या २६ मे रोजी श्री. संदेश जिमन यांचा विशेष सन्मान करणार आहेत.
   मुंबईतील गिरगांवच्या साहित्य संघ मंदिरात सकाळी ९.३० वाजता होणा-या या कार्यक्रमास कोकणवासीयांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.