पावशी येथे कामगार मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात.
कुडाळ.
पावशी भंगसाळ पुलानजीक कामगार मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे.ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
कुडाळ एमआयडीसीतून धुरी हे मध्यान्ह भोजनाचा टेम्पो घेऊन ओरोसच्या दिशेने जात होते. त्यावेळी भंगसाळ नदी पुलानजीक वळणावर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. महामार्गावर या अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चालकाला वाहन नियंत्रण ठेवता येत नाही. आजवर या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याची दाखल घेवून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

konkansamwad 
