उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.

वेंगुर्ला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत वेंगुर्ला सातेरी शाळा नं. ४ मध्ये खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्यावेळी महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई परब त्याचप्रमाणे तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा सचिव सुशील चमणकर, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ,शहर उपाध्यक्ष स्वप्नील परब आदी उपस्थित होते.