वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व वीज वितरण कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप.

वैभववाडी.
भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा कणकवली, देवगड , वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांच्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच शहरातील वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. संताजी रावराणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना ब्रँडेड कंपनीचे स्मार्ट वॉच दिले.सलग आठ वर्ष आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संताजी रावराणे हे विविध उपक्रम राबवत आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी भाजप मंडळ अध्यक्ष नासीर काझी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा सदस्य भालचंद्र साठे, माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, महिला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे, प्रकाश सावंत, नगरसेविका यामिनी वळवी, नगरसेविका संगीता चव्हाण, बाबा कोकाटे, नगरसेवक प्रदीप रावराणे, सुभाष रावराणे, संजय रावराणे, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रमोद रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, संजय सावंत, अरविंद रावराणे यांनी मनोगतातून आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संताजी रावराणे यांच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.