शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या तर्फे डेगवे शाळेला पाणी फिल्टर प्रदान.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या तर्फे डेगवे शाळेला पाणी फिल्टर प्रदान.

सावंतवाडी.

 माध्यमिक विद्यालय डेगवे शाळेला शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या तर्फे पाणी फिल्टर प्रदान करण्यात आला.शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगले स्वच्छ फिल्टर पाणी पिण्यास मिळावे व त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी कटीबद्ध असणारे व शिक्षणाचे महत्व जाणणारे शिवसेना उप तालुका प्रमुख माजी सरपंच मंगलदास देसाई शिवसेना उपविभाग प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्याकडे मागणी केली असता तात्काळ मागणीचा पुरवठा करण्यात आला. तसेच मंत्री दिपक केसरकर यांचे शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग विद्यार्थी मित्र व पालक ग्रामस्थ यांनी खास करुन आभार मानले.तसेच मंगलदास देसाई, विजय देसाई यांना ही त्यांच्या राजकिय व  विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.