कलंबिस्त येथील ठाकरे सेनेचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये......ठाकरे सेनेला मोठा धक्का
सावंतवाडी
कलंबिस्त येथील ठाकरे सेनेच्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी पुढाकार घेतला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व भाजपचे जिल्हा सरचिटणीस यांच्या प्रमुख उपस्थिती हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा मानसन्मान केला जाईल, असा विश्वास तिन्ही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला.
यावेळी सरपंच सौ. सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, ग्रामपंचायत सदस्य रिया सावंत, सौ. मेधा तावडे, आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, पंढरी राऊळ, आंबोली मंडळ उपाध्यक्ष किरण सावंत, युवा मोर्चा आंबोली निलेश पास्ते, स्वप्नील राऊळ, पुंडलिक कदम, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर, मान्यवर उपस्थित होते.

konkansamwad 
