सावंतवाडीत १० जानेवारी रोजी लेदर बॉल क्रिकेट निवड चाचणी.
सावंतवाडी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जिमखाना मैदानावर खुल्या गटातील मुले व मुली क्रिकेट संघ निवड चाचणी घेण्यात येणार आहे. हि चाचणी १० जानेवारी रोजी बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन आयोजित निमंत्रिताच्या साखळी स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ नेहमी भाग घेत आला आहे. असोसिएशनच्या साखळी स्पर्धेत भाग घेण्या अगोदर जिल्हया मार्फत निवड चाचणी घेऊन काही मुले स्पर्धेसाठी निवडले जातात. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खेळाडू चाचणी मध्ये भाग घेऊ शकतात.या निवड चाचणीत भाग घेऊ इच्छित खेळाडूंनी पूर्ण गणवेशात उपस्थित राहून आधारकार्ड व प्रवेश फी २०० रुपये सोबत घेऊन येणे गरजेचे आहे. मुलांची निवड चाचणी ९ वाजता तर मुली दुपारी २:३० वाजता असे दोन्ही चाचणी चे स्वरूप आहे असे आवाहन जिल्हा चेअरमन चोडणकर यांनी केले आहे.चाचणी संदर्भातील अधिक माहितीसाठी नंदू रेडकर (९४०३५५९८८४) व रघु धारणकर (९८९०८०२०९५) यांच्याशी संपर्क साधावा.