राज्याच्या काही जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा.
मुंबई.
सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहिले आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील पाच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
आजपासून पुढील दोन दिवस म्हणजेच १० ऑगस्टपर्यंत पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात आज व उद्या तर रायगड जिल्ह्यात आज तर रत्नागिरी जिल्हा व सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर आज धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्ह्यात व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सोबतच अमरावती, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात आणि दहा ते बारा ऑगस्ट पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यात असाच पाऊस अपेक्षित असल्याने या सर्व ठिकाणी सुद्धा यलो अलर्ट देण्यात आला आहे.