परुळे येथे १२ ते १४ जानेवारी कालावधीत स्व.ॲड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा.

परुळे येथे १२ ते १४ जानेवारी कालावधीत स्व.ॲड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा.

वेंगुर्ला.

   परुळे युवक कला क्रीडा मंडळ,परुळे आयोजित स्व.ॲड. अभयकुमार देसाई स्मृति राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यावर्षी दि.१२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.हे स्पर्धेचे ३३ वे वर्ष आहे. स्पर्धेतील प्रथम चार विजेत्या संघांस अनुक्रमे रु.१००००/-, ७०००/-, ५०००/-, व २०००/- अशी सांघिक व इतर वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.प्रथम येणाऱ्या १२ संघांस स्पर्धेत प्रवेश देण्यात येईल.या स्पर्धा श्री देव आदिनारायण मंदिर येथील रंगमंचावर संपन्न होणार आहेत शुक्रवार दिनांक १२ जानेवारी सायं. ०६.३० वा उद्घाटन समारंभ सायंकाळी ७.३० वाजता कलांगण, मालवण होय महाराजा, राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूर विषाण रात्रौ  ०९.३० वा.'ढ' मंडळी, कुडाळ यांची ढिम् टिंग ढि चम, रात्रौ १०.३० वा.रंगयात्रा, इचलकरंजी. कूपन शनिवार १३ जानेवारी  सायं. ०७.०० वा.श्री माऊली प्रतिष्ठान, पाट  कुलांगार सायं. ०८.०० वा नाट्य शोध रत्नागिरी तुती. रात्रौ द फोर्थ वाल थिएटर, डिचोली- पणजी-  अमर अमृतारविवार १४ जानेवारी सायं. ०७.०० वा.बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ कुकुऽच्चऽकू रात्रौ ०८.०० वा.गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर - बिइंग अँड नथिंगरात्रौ ०९.०० वा.महावीर कॉलेज, कोल्हापूर - निर्झर रात्रौ १०.०० वा.रंगप्रसंग कोल्हापूरफिल्टर टाईम रात्रौ ११.०० वा.अक्षरसिंधु साहित्य कलामंच, सिंधुदुर्ग -रात बातोंकी .२६ जानेवारी २०२४ रोजी ०७.०० वा.बक्षिस वितरण समारंभस्थळ - श्री देव आदिनारायण मंदिर रंगमंच परुळे येथे होणार आहे.