वेंगुर्ला तालुक्यात २ व ३ डिसेंबर रोजी रोटरीच्या भव्य क्रिडा स्पर्धा. महाराष्ट्र समवेत गोवा, कर्नाटक राज्यातील भागांचा समावेश.

वेंगुर्ला तालुक्यात २ व ३ डिसेंबर रोजी रोटरीच्या भव्य क्रिडा स्पर्धा.   महाराष्ट्र समवेत गोवा, कर्नाटक राज्यातील भागांचा समावेश.

वेंगुर्ला.

   रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या माध्यमातून रोटरी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्सचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गात प्रथमच अश्या स्पोर्ट्स चे आयोजन होत आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट स्पोर्टस् इव्हेंट्स यावर्षी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत सिंधुदुर्गातील वेंगुर्ला मध्ये आयोजीत केले आहेत. या स्पर्धा दि. २ व ३ डिसेंबर रोजी वेंगुर्ला कॅम्प येथील सुनील गावस्कर स्टेडियम मैदानावर पार पडणार आहेत अशी माहिती रोटरी क्लब वेंगुर्लाचे अध्यक्ष शंकर उर्फ राजू वजराटकर यांनी दिली आहे. वेंगुर्ले येथील रोटरी क्लबच्या कार्यालयात रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परीषदेत सर्वप्रथम स्पर्धेच्या चषकांचे अनावरण  वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लब अध्यक्ष राजू वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, ट्रेजरर पंकज शिरसाट, इव्हेंट चेअरमन राजेश घाटवळ, इव्हेंट सेक्रेटरी ॲड. प्रथमेश नाईक, इव्हेंट चेअरमन मुकुल सातार्डेकर, स्पोर्टस हेड दिलीप गिरप, असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, सचिन वालावलकर, गणेश अंधारी, दिपक ठाकूर, मृणाल परब, नागेश गावडे, डॉ. राजेश्वर उबाळे आदि रोटरियन उपस्थित होते. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० मध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, तसेच पूर्ण गोवा राज्य ,कर्नाटक राज्यातील बेळगांव, हुबळी, धारवाड आदि भागांचा समावेश असणार आहे. या सर्व स्पोर्ट्स मध्ये झोनल स्पोर्टस मधील विजेते आणि उपविजेते संघ डिस्ट्रिक्ट स्पोर्टसमध्ये खेळू शकतात. क्रीडा प्रकारात क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुध्दिबळ तसेच अॅथलेटिक्स मध्ये १०० मीटर रनिंग, १००*४ मी. रिले आणि गोळाफेक आदी खेळांचा समावेश आहे. या रोटरी क्लबच्या स्पोर्ट्स इव्हेंटचे उदघाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासीरभाई बोरसादवाला व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.भावी प्रांतपाल लेनी डिकोस्टा,शरद पै.विक्रांतसिंग कदम,वासुकी सानजी,अजय सेनन,प्रसन्न देशींगकर, संजय साळुंखे,क्लबचे असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे यांच्यासोबत रोटरीतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.