जलजीवन मिशन अंतर्गत आडेली-खुटवळवाडी येथील नळपाणी योजनेचा शुभारंभ.
वेंगुर्ला.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना जलजीवन मिशन अंतर्गत आडेली-खुटवळवाडीसाठी मंजूर झालेल्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन सरपंच यशश्री कोंडस्कर यांच्या हस्ते व श्रीधर नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, भाजपा तालुका चिटणीस समीर कुडाळकर, सदस्य भाऊ गडेकर, उपसरपंच परेश हळणकर, ग्रा.पं. सदस्य सुधीर धुरी, सुनील गडेकर, तात्या कोंडसकर, अशोक गडेकर, सत्यवान कुडाळकर, विनोद कुडाळकर, समीर गडेकर, आत्माराम परब, यशवंत परब, संदेश सुळवाडकर, सदानंद परुळेकर, निलेश धुरी, उमेश शेणई, जीजी गडेकर, सुनिता गडेकर, कृष्णा राऊळ, संतोष वराडकर, हरी पेडणेकर, आनंद राणे आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी जमीनदाते बाळा नाईक यांचे आभार व्यक्त करण्यात आले.