वेताळ प्रतिष्ठानतर्फे खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

वेताळ प्रतिष्ठानतर्फे खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

 

तुळस

 

     वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्यावतीने सलग बाराव्या वर्षी “अश्वमेध” महोत्सवांतर्गत खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विचारशीलता, मूल्याधिष्ठित दृष्टीकोन आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे प्रतिष्ठानतर्फे ही निबंध स्पर्धा आयोजित केली जाते.
   यंदाच्या स्पर्धेचे विषय समाजजीवनातील जबाबदारी, राष्ट्रप्रेम आणि नैतिक मूल्यांचा विचार मांडणारे आहेत. स्पर्धा दोन गटांत घेण्यात येणार आहे — खुला गट आणि शालेय गट (इयत्ता १० वी पर्यंत).समाजजीवनात राजकारण हा सार्वजनिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. परंतु आज या क्षेत्रात नैतिकता, जबाबदारी आणि पारदर्शकतेचा अभाव जाणवतो. या प्रश्नावर सर्वसामान्य नागरिकांचे मत आणि मूल्याधिष्ठित विचार जाणून घेण्यासाठी खुल्या गटासाठी “राजकारणात मूल्यांची कमतरता – जबाबदार कोण?”  हा विषय निवडण्यात आला आहे.
    विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी या हेतूने शालेय गटासाठी “मी मोठा झालो की देशासाठी काय करेन? हा प्रेरणादायी विषय ठेवण्यात आला आहे.

बक्षीस संरचना

खुला गट
प्रथम – ₹११०० चषक व प्रमाणपत्र
द्वितीय – ₹७७७ चषक व प्रमाणपत्र
तृतीय – ₹५५५ चषक व प्रमाणपत्र

शालेय गट
प्रथम – ₹७७७ चषक व प्रमाणपत्र
द्वितीय – ₹५५५ चषक व प्रमाणपत्र
तृतीय – ₹३३३ चषक व प्रमाणपत्र

        असे पारितोषिकाचे स्वरूप असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सर्व स्पर्धकांनी निबंध कागदाच्या एका बाजूस स्व: हस्ताक्षरात लिहावा.खुला गटासाठी किमान १००० शब्द तर शालेय गटासाठी किमान ५०० शब्द अशी शब्द मर्यादा असून पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि (शालेय गटासाठी) शाळेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.

निबंध पाठविण्याचा पत्ता
वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस
द्वारा: डॉ. सचिन वासुदेव परुळकर
मु.पो. तुळस, खरीवाडी, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग – ४१६५१५
???? मो. ९४२१२३८०५३

       निबंध पाठवण्याचे किंवा हाती देण्याची अंतिम दिनांक २५ डिसेंबर २०२५ अशी आहे. “अश्वमेध २०२६” निबंध स्पर्धा ही समाजातील मूल्यनिष्ठ विचार, सर्जनशील लेखन आणि युवा पिढीतील जागरूकता वाढविण्यासाठी वेताळ प्रतिष्ठानचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. प्रतिष्ठानतर्फे सर्व नागरिक आणि विद्यार्थी बांधवांना या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.