बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; एक जण ताब्यात. एकूण १३ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त.
सावंतवाडी.
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने गोवा येथील एकावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून दारू आणि कार मिळून एकुण १३ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग- तिलारीनगर रस्त्यावर करण्यात आली.या प्रकरणी ईश्वर रणजीत सिंह (वय ३१, रा. जुनासवाडा-मांद्रे, गोवा) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोडामार्ग- तिलारीनगर रोडवर सापळा रचून गोव्याहून येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या सफेद रंगाची स्कॉर्पिओची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. आरोपी ईश्वर सिंह याला ताब्यात घेत त्याच्याकडून दारूसह १३ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली श्री. संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, प्रसाद माळी, रणजीत शिंदे आदींनी केली.
सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली प्रदीप रास्कर हे करीत आहेत.