कळसुलकर हायस्कूल येथे सायबर क्राईम मार्गदर्शन शिबीर संपन्न.

कळसुलकर हायस्कूल येथे सायबर क्राईम मार्गदर्शन शिबीर संपन्न.

सावंतवाडी.

   नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता व सावधानता बाळगावी. सावध तो सुखी, असे प्रतिपादन सायबर क्राईम विषयाचे मार्गदर्शक चंद्रशेखर ठाकुर यांनी केले.
   महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते तथा माजी आमदार जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतून तसेच मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारातून सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. प्रमुख मार्गदर्शक चंद्रशेखर ठाकुर यांनी इंटरनेट सेवेमुळे फसवणूक करणारे मेसेज, बनावट फोन कॉल / ई-मेल, ऑनलाईन अथक व्यवहारातील फसवणूक आदींबाबत मार्गदर्शन केले.
   सूत्रसंचालन प्रा. उत्तम पाटील यांनी केले. यावेळी मुख्याध्याप नारायण मानकर, महाराष्ट्र नवनिर्मा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशि सुभेदार, नीलेश देसाई, मनो कांबळी, प्रकाश साटेलकर, स्वप्नी जाधव, सोनाली परब उपस्थित होते. आभार कोलगावकर यांनी मानले.