केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग होणार? जाणून घ्या.

केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग होणार? जाणून घ्या.

नवीदिल्ली. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मात्र काय स्वस्त आणि काय महाग होणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं. यंदा मोठ्या घोषणा करीत असताना अर्थमंत्री सीतारमण यांनी मोबाईल फोन स्वस्त करण्याची घोषणा केली. त्याशिवाय कॅन्सरची औषधं स्वस्त केली आहेत. लिथियम आयन बॅटरी स्वस्त करणार असल्याचं जाहीर केलं. यामुळे इलेट्रॉनिक वाहनं स्वस्त होऊ शकतात. सोबतच इम्पोर्टेंड ज्वेलरी स्वस्त होणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.  

 काय स्वस्त आणि काय महाग होणार? 

 काय स्वस्त होणार?

सोनं, चांदी स्वस्त होणार
सोनं-चांदीवर 6.5 टक्के ऐवजी 6 टक्के आयात कर
मोबाईल हँडसेट
मोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार
मोबाईलचे सुटे भाग
कॅन्सरवरची औषधे
पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत
लिथियम बॅटरी स्वस्त 
इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार
सोलार सेट स्वस्त होणार
चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू
पीवीसी फ्लेक्स बॅनर
विजेची तार

 काय महाग होणार?

प्लास्टिक सामानावरील आयात शुल्कात वाढ
पेट्रोकेमिकल-अमोनियम नायट्रेटवरील सीमा शुल्क वाढवले
पीवीसी-इंपोर्ट घटविण्यासाठी 10-25 टक्क्यात वाढ
विमान प्रवास महाग
सिगारेट पण महाग.