शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे आयोजित महिलांची भव्य रस्सीखेच स्पर्धा संपन्न

शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे आयोजित महिलांची भव्य रस्सीखेच स्पर्धा संपन्न

 

कुडाळ


        खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे यांच्या वतीने महिलांसाठी भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा शुभारंभ कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला. जय वेतोबा महिला संघ हा या स्पर्धेचा विजेता संघ ठरला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, शिवसेना कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद गावडे, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका श्रुती वर्दम, माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, ग्रामपंचायत सदस्य साजुराम नाईक, अवधूत सामंत, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.