जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पोलीस पाटील संघटनेने घेतली सदिच्छा भेट

सिंधुदुर्गनगरी
जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) यांची महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना, शाखा सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान ई-पिक पाहणी, तसेच पोलीस पाटीलांकडून दिले जाणारे विविध दाखले आणि अवेळी मिळणाऱ्या मानधनासंबंधी अडचणी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत जिल्हाधिकारी सौ. धोडमिसे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि पोलीस पाटीलांना यापुढील काळात निश्चित मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. स्वप्निल वेंगुर्लेकर(कुडाळ), वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मधुसूदन सुतार मेस्त्री, (आरवली बांध, सागरतीर्थ) व्यंकटेश कोचरेकर (खवणे), संजय गोरूले (कोळोशी), श्री. गावकर (माईन), जिल्हा सदस्य राजेश जानकर ( कुडाळ), विजय नार्वेकर (उभादांडा), सौ. निकिता पोखरे (आजगाव),सौ. ऋतुजा नाईक (पाल), निलेश पोळजी (आसोली), केशव कुडव (टेंब,) आणि विश्वनाथ सोन्सुरकर (सोन्सुरे)आदी पोलिस पाटील उपस्थित होते.