सावंतवाडी वन विभागा तर्फे नरेंद्र डोंगर येथे निसर्गभ्रमंती व पर्यावरण संवर्धन कार्यशाळा संपन्न.

सावंतवाडी वन विभागा तर्फे नरेंद्र डोंगर येथे निसर्गभ्रमंती व पर्यावरण संवर्धन कार्यशाळा संपन्न.

सावंतवाडी.

     पर्यावरणप्रेमी व निसर्गअभ्यासक याचेंसाठी सावंतवाडी वन विभागाने, माय वे जर्नि ऑर्गनायझेशन यांचे मदतीने आयोजित केलेल्या निसर्गभ्रमंती व जनजागृती कार्यशाळेस विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांचेकडून आज उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. ही निसर्गभ्रमंती व जनजागृती कार्यशाळा उत्साहपूर्णक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या निसर्गभ्रमंतीसाठी कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी तसेच रत्नागिरीतील लांजा वरून आलेले निसर्गअभ्यासक तसेच उपवनसंरक्षक सावंतवाडी व सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे देखील सहभागी झाले होते.
    याचे सविस्तर वृत्त असे की, नरेंद्र डोंगरावर आढळून येणाऱ्या वनस्पती व वन्यप्राणी यांच्या जैवविविधतेचे निरीक्षण करून अभ्यासण्यासाठी तसेच त्यांच्या संवर्धनाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी, माय वे जर्नि ऑर्गनायझेशन यांच्या मदतीने आज सकाळ पासून निसर्गभ्रमंती आयोजित करण्यात आली होती. या भ्रमंती दरम्यान आज नरेंद्र डोंगरावर जमलेल्या निसर्गप्रेमीना शेकरू, हरणटोळ साप, विविध जातीची बेडके, मुंग्या, पक्षी यांचे दर्शन झाले व निरीक्षणे नोंदविण्यात आली. या निसर्गभ्रमंती नंतर पर्यावरण जनजागृती कार्यशाळा पार पडली. ज्यामध्ये विविध प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक यांची माहिती देऊन निसर्गप्रेमींच्या शकांचे निरसन करण्यात आले. उपस्थित सर्व निसर्गप्रेमींचे आभार मानून या उपक्रमाची सायंकाळी सांगता करण्यात आली.
    या उपक्रमासाठी विविध ठिकाणावरून आलेल्या निसर्गप्रेमी याचेंसोबत उपवनसंरक्षक सावंतवाडी वन विभाग श्री.नवकिशोर रेड्डी तसेच सावंतवाडी मुख्याधिकारी श्री.सागर साळुंके देखील उपस्थित होते. उपवनसंरक्षक सावंतवाडी वन विभाग यांचे संकल्पनेतून या निसर्गभ्रमंतीचे नियोजन करण्यात आले होते. या निसर्गभ्रमंतीसाठी माय वे जर्नि ऑर्गनायझेशन व सावंतवाडी परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर तसेच सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांचेकडून आयोजन करण्यात आले.