दिव्यांग महिलांसाठी राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा

दिव्यांग महिलांसाठी राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा

 

वेंगुर्ला

 

      वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग महिलांसाठी राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.समाजात अनेक अडचणींवर मात करत दिव्यांग महिला आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहेत. शारीरिक मर्यादा असूनही त्यांनी जीवनातला संघर्ष आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पार केला आहे. त्या एक पत्नी, आई, मुलगी, बहीण या नात्यांसोबतच समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणूनही पुढे येत आहेत. त्यांचे जीवन हे आत्मसन्मान, संघर्ष, कर्तव्य आणि आत्मनिर्भरतेचा एक सुंदर संगम आहे. आजच्या घडीला दिव्यांग महिला शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य अशा अनेक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. त्यांच्या अनुभवांना, संघर्षाला योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच समाजात त्यांचे सकारात्मक योगदान अधोरेखित व्हावे, यासाठी या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

  • स्पर्धेसाठी विषय: माझी कहाणी–माझा आत्मसन्मानाचा प्रवास

          
         दिव्यांग महिलांनी किमान ७०० ते कमाल १००० शब्दांमध्ये मराठी भाषेत आपले विचार मांडायचे आहेत. सोबत दिव्यांग असल्याचे वैध प्रमाणपत्राची छायाप्रत किंवा सरपंच याचे दिव्यांग असल्याबाबतचे पत्र जोडणे अनिवार्य आहे.

 

  • स्पर्धेची पारितोषिके

प्रथम क्रमांक – रोख ₹१०००, चषक आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक – रोख ₹७००, चषक आणि प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक – रोख ₹५००, चषक आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ प्रथम – रोख ₹२५०, चषक आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ द्वितीय – रोख ₹२५०, चषक आणि प्रमाणपत्र

 

  • निबंध पाठविण्याचा पत्ता

निबंध स्व:हस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा प्रत्यक्ष हाती खालील पत्त्यावर २० जून २०२५ पर्यंत पाठवावा

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस;
द्वारा: प्रा. डॉ. सचिन वासुदेव परुळकर,
मु.पो. तुळस, ता. वेंगुर्ला,
जिल्हा सिंधुदुर्ग, पिन - ४१६५१५.

 

     अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.