आचरा वरचीवाडी येथील आयोजित आयुष्यमान भारत कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मालवण.
आचरा वरचीवाडी येथील समर्थ नगर येथे जयप्रकाश परुळेकर, रुपेश हडकर आणि ग्रामपंचायत सदस्या किशोरी आचरेकर यांच्या सहकार्याने आयोजित आयुष्यमान भारत मोफत कार्ड वितरण कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात समर्थ नगर परिसरातील एकूण तीस लाभार्थ्यांना मोफत आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून देण्यात आले.
सदर शिबिर यशस्वीतेसाठी जयप्रकाश परुळेकर, रुपेश हडकर, ग्रामपंचायत सदस्य सौ किशोरी आचरेकर, किशोर आचरेकर यांनी विशेष परीश्रम घेतले.यावेळी सचिन हडकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर आदींच्या उपस्थितीत कार्ड वितरीत करण्यात आले.