रोटरी क्लब सावंतवाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर......अध्यक्षपदी ॲड. सिद्धार्थ भांबूरे

सावंतवाडी
सावंतवाडीच्या रोटरी क्लब अध्यक्षपदी रो.अॅड. सिद्धार्थ भांबूरे यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी रो. सिताराम तेली, खजिनदारपदी रो.आनंद रासम यांची निवड करण्यात आली असून ६ जुलै रोजी भगवती हॉल, मळगाव येथे पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डिजीई रो.डॉ.लेनी डा कोस्टा व एजी रो. सचिन मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब सावंतवाडीकडून करण्यात आले. सावंतवाडी येथे रोटरी क्लब सावंतवाडीकडून पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब सावंतवाडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रो.अॅड सिद्धार्थ भांबूरे, सचिव रो.सिताराम तेली, खजिनदार रो.आनंद रासम, मावळते अध्यक्ष रो.प्रमोद भागवत, रो.राजन हावळ, रो.सुबोध शेलटकर, रो.सुहास सातोसकर, रोट्रॅक्टर क्लबचे अध्यक्ष सिद्धेश सावंत आदी उपस्थित होते. यावेळी अॅड.भांबुरे म्हणाले, २०२५-२६ साठी ग्लोबल ग्रॅण्ड मिळाली आहे. नॅब हॉस्पिटल येथे यातून ४५ लाखांची अत्याधुनिक व्हॅन दिली जाणार आहे. गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे. या वर्षात देखील समाजोपयोगी उपक्रम आम्ही राबणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सावंतवाडी रोटरी क्लबची स्थापना १९७२ साली झाली. यावर्षी प्रेसिडेंट म्हणून मला मान देण्यात आला आहे. ६ जुलै रोजी पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, मावळते अध्यक्ष रो. भागवत म्हणाले, मागील वर्षात ११ हजार झाड लावली. एरो मॉडेलींग शो, रोटरी मेंबर, पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर, एसटी कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी, रक्तदान शिबीर आम्ही आयोजित केली. तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, आरोग्यदृष्ट्या उपयोगी असे विविध उपक्रम राबविले असल्याची माहिती त्यांनी दिली.