वेंगुर्ला येथे १७ मे पासून करियर मार्गदर्शन कार्यशाळा

वेंगुर्ला  येथे १७ मे पासून  करियर मार्गदर्शन कार्यशाळा

 


वेंगुर्ला


         नगरपरिषद आणि व्हिजन वेंगुर्ला, मुंबईच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय विद्यार्थी करियर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. १७, १८, २४, २५ मे ला दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत हा सोहळा वेंगुर्ले नगरपरिषदेच्या लोकमान्य सभागृहात पार पडणार आहे. याचे उद्घाटन वेंगुर्ला तहसीलदार, ओंकार ओतारी यांच्या हस्ते होणार असून वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, हेमंत किरूळकर कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर माजी मुख्याधिकारी, वेंगुर्ला परिषद तथा सहाय्यक आयुक्त, नागपूर महानगरपालिका पारितोष कंकाळ विशेष अतिथी असतील. सोबतच साताऱ्याचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश, आकाश रेडकर, पंचायत समिती, वेंगुर्ला गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, पंचायत समिती, वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या विशेष उपस्थितीत या करियर कार्यशाळेचा सोहळा संपन्न होणार आहे.तसेच उद्या दुपारी ०२ ते ०६ दरम्यान प्रथम सत्रात न्यायालय आणि कायदे यामधील उपलब्ध संधी, परीक्षांची तयारी, पोक्सो कायदा या विषयावर अतिरिक्त मुख्य न्यायाधीक्ष सातारा आकाश रेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तर द्वितीय सत्रात सोशल माध्यम, मुलांची मानसिकता आणि उपलब्ध नवनवीन संधी या विषयावर आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, वरवडे, कणकवली आणि कॉमर्स विभाग प्रमुख, गुरुकुल अकॅडमी कणकवली, सोशल, मिडिया इन्फ्लून्सर, सर्वोकृष्ट रिल्स मेकर आणि विविध पुरस्कार विजेते प्रा. अक्षय हेदुळकर मार्गदर्शन करतील. तृतीय सत्रात मुंबईस्थीत नाट्य कलाकार, लेखक, सूत्रसंचालक असलेले किसन पेडणेकर एकांकिका, लेखन, मालवणी भाषा, समाजसेवा आणि विविध संधी याबद्दल संवाद साधणार आहेत.१८ मे ला दुपारी ०२ ते ०६ दरम्यान प्रथम सत्रात टीव्ही मालिका, सिनेक्षेत्रातील संभाव्य अडचणी आणि उपलब्ध संधी याबाबत आघाडीच्या मालिकांचे दिग्दर्शक, कार्यकारी निर्माता मुंबईस्थीत निलेश डिचोलकर तर द्वितीय सत्रात अभिनय, संवाद, लेखन क्षेत्रातील उपलब्ध संधी याविषयावर अभिनेता, लेखक, दिग्दर्शक रोहन पेडणेकर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या आठवड्यात २४ मे ला दुपारी ०२ ते ०६ दरम्यान पहिल्या सत्रात सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकारी, सखाराम सावंत कोकण कृषी क्षेत्रातील शासकीय योजना आणि संधी याविषयी संवाद साधतील. तर द्वितीय सत्रात इंटीरियर डिझायनर क्षेत्रातील उपलब्ध संधी या महत्वाच्या विषयाची माहिती मुंबईच्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडचे वरिष्ठ वास्तुविशारद (आर्किटेक्ट) डिझाइन स्ट्रॅटेजी व्यवस्थापक निलेश वेंगुर्लेकर आणि तृतीय सत्रात मंत्रालय, मुंबई येथील मंत्री कार्यालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तथा माध्यम सल्लगार कृष्णदर्शन जाधव हे जनसंपर्क, माहिती, माध्यम, प्रसिद्धी क्षेत्र, सोशल मिडिया आणि उपलब्ध संधी, वक्तृत्व कला, मंत्र्यांची भाषणकला याविषयावर संवाद साधणार आहेत. रविवार २५ मे, रोजी दुपारी ०२ ते ०६ दरम्यान प्रथम सत्रात एल आय सी, मुंबईचे विकास अधिकारी मिलिंद परब महिलांसाठी एलआयसी विशेष संधी, गुंतवणूक, विमा संरक्षण आणि उपलब्ध संधीबद्दल मार्गदर्शन करतील, तर द्वितीय सत्रात सुप्रसिद्ध निवेदिका, स्तंभ लेखिका, रेडिओ जॉकी मुंबई रश्मी वारंग या व्यक्तिमत्व विकास, आवाज, उच्चार, माध्यम क्षेत्रातील निवेदन, सूत्रसंचालन आणि उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.वेंगुर्ला व्हिजन मुंबई ही संस्था आपल्याच वेंगुर्ला शहर आणि एकूणच वेंगुर्ला तालुक्याच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टिकोनातून वेंगुर्ला, मुंबई, पुणे आणि देशविदेशातील अनेक वेंगुर्लेकर मंडळींनी "माझं वेंगुर्ला माझी जबाबदारी" निश्चित करून स्थापन केलेली अग्रगण्य संस्था आहे व्हिजन वेंगुर्लाच्या कनेक्ट वेंगुर्ला अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून यात प्रथमच वेंगुर्ला येथील विद्यार्थी आणि पालक यांना दिशा देणारा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. याचा वेंगुर्ला तालुक्यातील सातवी ते पदवीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन भवितव्यांच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन व्हिजन वेंगुर्लाचे निमंत्रक कृष्णदर्शन जाधव यांच्यासह मिलिंद परब, रिता घाडी, किसन पेडणेकर आणि संगीता धुरी परब यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 8898072481 या क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले आहे.