कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

 

सावंतवाडी
 

    आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची गरज आहे. विशेषत: कोकणातील तरुणांनी कोकणातच राहून रोजगार निर्मिती केली पाहिजे. तरूण तरुणीने नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बना असा मोलाचा सल्ला उपस्थित तरुण-तरुणींना आणि त्यांच्या पालकांना ज्ञानदा गुरुकुल पुणे या संस्थेचे संचालक मिलिंद डांगे यांनी दिला. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी व ज्ञानदा गुरुकुल संस्था यांच्यावतीने आयोजित प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ह्याच प्रसंगी कु.सागर कोकरे ह्या तरूणाने आपण ज्ञानदा गुरूकुल पुणे येथे शिकून आत्मनिर्भर कसे झालो याचे  कथन केले. सावंतवाडी व परिसरातील युवकांना "प्लंबिंग कौशल्य वृद्धी प्रशिक्षण"  घेता यावे यासाठी कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे एका महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून पुढील एक महिन्याचे प्रशिक्षण ज्ञानदा गुरुकुल संस्था येथे होणार आहे. पुणे येथील प्रशिक्षण हे प्रात्यक्षिक  स्वरूपाचे असेल अशी माहिती संस्थेचे संचालक मिलिंद डांगे यांनी सांगितले. प्रशिक्षणाचे उद्घाटन कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे श्री डांगे यांच्या हस्ते व संस्थाध्यक्ष शैलेश पई, सोमनाथ कुलकर्णी, अमित नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी शाळेच्या संचालिका नम्रता नेवगी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, संचालक श्री. स्वार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अधिकारी श्री. प्रफुल्ल सांगोडकर, प्राध्यापक दिलीप गोडकर  तसेच नंदकुमार गावडे, प्रशाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत भुरे, शिक्षक तसेच प्रशिक्षणाचे संपर्कप्रमुख डि.जी. वरक, उच्च माध्यमिकचे उत्तम पाटील, प्रसाद कोलगावकर, नवीन प्रशिक्षणार्थी, पालक, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश पई यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरक यांनी केले. सदर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी डि.जी.वरक ९४२३२१३९७२ यांच्याशी संपर्क करावा.