ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे सुयश

वेंगुर्ला
ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा दिनांक 12 जानेवारी २०२५ रोजी पार पडली.या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचे दोन विद्यार्थी तालुक्यात प्रथम आले आहेत.त्यामध्ये कु.तनिषा मनिष सातार्डेकर हीने 90 गुण मिळवून वेंगुर्ले तालुक्यात इंग्रजी माध्यमातून इयत्ता पहिलीतून प्रथम क्रमांक व संपूर्ण देशात 87 वा क्रमांक प्राप्त केला आहे तसेच कु.श्रेयांश सचिन सावंत हा 93 गुण मिळवून तालुक्यात इंग्रजी माध्यमातून इयत्ता तिसरीतून प्रथम आला असून संपूर्ण देशात त्याने 55 वा क्रमांक प्राप्त केला आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सचिव दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.